जळगाव मिरर | ३० मे २०२३
जळगांव येथील स्पर्धा परीक्षा क्षेत्रात कार्यरत असलेल्या दर्जी फाऊंडेशनकडून कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी राजे यांचे शिवसंवाद कार्यक्रमा निमित्त जळगांव येथे आगमन झाले.

त्यावेळेला दर्जी फाऊंडेशनचे संचालक प्रा.गोपाल दर्जी यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना दर्जी फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांची व यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी.मध्ये ग्रामिण भागातील युवकांना मिळालेले यश व त्यासाठी गेल्या 1998 पासून सातत्यपूर्ण स्पर्धा परीक्षा क्षेत्रात युवकांसाठी केलेल्या कार्यांची माहिती महाराजांना दिली. महाराजांनीही दर्जी फाऊंडेशनच्या शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या. या स्वागत प्रसंगी श्रीराम ग्रृपचे अध्यक्ष-श्री.श्रीराम पाटील, राम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.




















