
जळगाव मिरर | ३० मे २०२३

जळगाव शहरात अपघाताचे प्रमाण हे नित्याचेच झाले आहे. यातच एका परिसरातील मुख्य रस्त्यावर दुचाकीवर उभे असलेले ५२ वर्षीय वृद्ध व्यक्तीस अनोळखी मुलीने धडक देत जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शिव कॉलनी परिसरातील मुख्य रस्त्यावर शिव कॉलनी परिसरातील रहिवासी मनोहर बाबूलाल चौधरी(वय ५२) हे दि २९ मे रोजी दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास उभे असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीवरील अनोळखी मुलीने जोरदार त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने वृद्ध हे जागीच पडले. त्यानंतर त्यांना परिसरातील काही नागरिकांनी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून दुचाकीस्वार अनोळखी मुलीविरोधात रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ.सुनील पाटील हे करीत आहेत.




















