• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे उपस्थितीत शासन आपल्या दारी कार्यक्रम

जळगावात २७ जुनला आयोजन : सर्व विभागाने काळजी पुर्वक काम करा : उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 20, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सरकारी योजना, सामाजिक
0
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे उपस्थितीत शासन आपल्या दारी कार्यक्रम
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २० जून २०२३

राज्यातील शिवसेना – भाजपा युती सरकारने विविध विभागांच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना मिळण्यासाठी “शासन आपल्या दारी” ही योजना राबविण्यास विविध ठिकाणी सुरुवात केली असतांना जळगाव येथे दिनांक २७ जुन रोजी मंगळवारी पोलिस कवायत मैदानावर जिल्ह्यातील सुमारे ७५ हजार नागरीकांना या योजनेचा लाभ देण्याचे ठरविले आहे.
दुपारी चार वाजता होणाऱ्या या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री ना. अबुल सत्तार, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, ना. गिरीष महाजन, आमदार किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार लताबाई सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार संजय सावकारे, जिल्हा अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी सह जिल्हा भरातील उपविभागीय अधिकारी, तहशिलदार, गटविकास अधिकारी व विविध विभागांचे प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित केला आहे.

“शासन आपल्या दारी” योजनेत पंचायत समिती, कृषी विभाग, नगरपरिषदेच्या विविध योजना, आरोग्य विभाग, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, विजविरण कंपनी, संजय गांधी निराधार योजना, पशुसंवर्धन विभाग, सहकार विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभागाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे. “शासन आपल्या दारी” ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मंगळवारी पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसिलदार प्रविण चव्हाणके, तहसिलदार मुकेश हिवाळे, यांच्या उपस्थितीत तिसरी आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीत मार्गदर्शन करतांना उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी विविध भागाच्या प्रमुखांना योजना राबविताना सर्व विभागाने काळजी पूर्वक काम करण्याची सुचना देवून विभाग प्रमुखांनी आपले लाभार्थी निवडून त्यांना जळगाव येथे घेवून जाणे व कार्यक्रमानंतर घरी सोडण्याची जबाबदारी स्विकारावी. काही विभागातील कार्यालय प्रमुख किंवा त्यांचे प्रतिनिधी गैरहजर असल्याने प्रांताधिकारी भुषण अहिरे यांनी नाराजी व्यक्त करत गैरहजर असणाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याच्या सुचना केल्या आहेत. याशिवाय शुक्रवारी दुपारी चार वाजता पुन्हा शेवटची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी विभाग प्रमुख येणाऱ्या लाभार्थ्यांची यादी तयार करून त्याचा आढावा सादर करण्याच्या सूचना दिल्या. शासना आपल्या दारी योजनेत विविध शासकीय योजनांचा पाचोरा तालुक्यातील एक हजार व भडगाव तालुक्यातील एक हजार अशा दोन हजार तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील ७५ हजार नागरीकांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे.

पाचोरा येथे झालेल्या आढावा बैठकीत निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, सांगायचे नायब तहसिलदार बी. डी. पाटील, प्रांताधिकारी कार्यालयाचे नायब तहसिलदार सुभाष कुंभार, रमेश मोरे, पालिकेचे उपमुख्याधिकारी दगडू मराठे, विजविरण कंपनीचे आर. व्ही. सिरसाठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे डी. एम. पाटील, शिक्षणाधिकारी शिरीष जगताप, मुकेश भुमरे, रविंद्र लांडे, अभिजित येवले, डॉ. सुजाता सावंत, शोभा मगर, एस. बी. आय. च्या सोनाली पवार, सहकार विभागाचे महेश कासार, अमोल भोई, पोस्ट मास्तर राजेंद्र वाणी, सब रजिस्टार एस. एस. बारस्कर उपस्थित होते.

Related Posts

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !
जळगाव

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

October 30, 2026
प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !
जळगाव

प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

October 30, 2026
नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!
क्राईम

नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!

October 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

फत्तेपूरमध्ये भरधाव डंपरची मजुराला जोरदार धडक; मजुराचा जागीच मृत्यू!

October 30, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

भुसावळच्या शिक्षक पतपेढीत १.९३ कोटींचा कथित घोटाळा; ९८ सभासदांच्या नावाने बनावट कर्जप्रकरणे!

October 30, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

अल्पवयीन मुलीला धमकावून अत्याचार; सहा वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा!

October 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

October 30, 2026
प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

October 30, 2026
नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!

नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!

October 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

फत्तेपूरमध्ये भरधाव डंपरची मजुराला जोरदार धडक; मजुराचा जागीच मृत्यू!

October 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group