
जळगाव मिरर | २२ जून २०२३
जगभरात नुकताच जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तर जळगाव शहरातील रोझलँड इंग्लिश मीडियम शाळेत देखील या योगदिन साजरा करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील रोझलँड इंग्लिश मीडियम शाळेत दि.२१ जून रोजी लता मंगेशकर या सभागृहात जागतिक योगा दिवस शाळेत साजरा करण्यात आला. यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांना योगा प्रशिक्षण डॉ.प्राची सोनार यांनी दिले व विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून दिले. यावेळी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.





















