• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दर्शनाच्या खुनाची राहुलने दिली कबुली ; कारण वाचून बसेल धक्का !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 22, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
दर्शनाच्या खुनाची राहुलने दिली कबुली ; कारण वाचून बसेल धक्का !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ जून २०२३

गेल्या १८ जून रोजी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत राज्यात विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिच्या खूनप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी तिचा मित्र राहुल दत्तात्रेय हंडोरे याला मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवरून बुधवारी रात्री अटक केली. दर्शनाचे लग्न दुसऱ्या मुलाशी ठरल्याने तिचा तीक्ष्ण हत्याराने आणि दगडाने वार करून खून केल्याची कबुली राहुल याने दिल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली दिली. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील हिंगणे येथील राहुल दत्तात्रेय हंडोरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शना दत्तू पवार (वय २६, रा. न-हे, मूळ कोपरगाव, जि. अहमदनगर) हिचा मृतदेह किल्ले राजगडच्या पायथ्याशी १८ जून रोजी आढळून आला होता. दर्शना ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत राज्यात विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झाली होती. तिचा खून झाल्यामुळे खळबळ उडाली होती. घटनास्थळी मोबाईल, बूट ,गॉगल, पर्स, ओढणी या वस्तूंवरून दर्शनाच्या मृतदेहाची ओळख पटली. शवविच्छेदन अहवालात डोक्यावर आणि अंगावरील मारहाणीच्या जखमांमुळे दर्शनाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पुणे ग्रामीणच्या वेल्हे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पाच पथकांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत होता. दर्शना ही नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील असून, राहुल हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील रहिवासी आहे. ते दोघे लहानपणापासूनचे मित्र असून, लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देत होते. दोघे लग्न करणार होते.

राहुल स्पर्धा परीक्षेच्या तयारीसह फूड डिलिव्हरी सर्विसमध्ये काम करीत होता. राहुल याने परीक्षेपूर्वी तिच्याशी ब्रेकअप केले होते. दर्शनाची लोकसेवा आयोगामार्फत वन अधिकारी (आरएफओ) पदावर निवड झाली. त्यानंतर राहुल पुन्हा लग्नासाठी तिच्या मागे लागला होता. दरम्यान, दर्शनाच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी जमवल्याने राहुल अस्वस्थ होता. त्याने परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा, असे त्याने सांगितले. परंतु दर्शनाकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

दरम्यान, दर्शना ही ९ जून रोजी पुण्यात एका खासगी अकॅडमीतर्फे आयोजित सत्कार समारंभासाठी आली होती. त्यानंतर ती सोमवारी (ता. १२) राहुलसोबत सिंहगड आणि राजगड किल्ला फिरण्यासाठी दुचाकीवर गेली होती. परंतु दर्शनाचा फोन लागत नसल्यामुळे दर्शनाचे वडील आणि नातेवाइकांनी किल्ले राजगडच्या परिसरात शोध घेतला. परंतु तिचा ठावठिकाणा लागत नसल्यामुळे वडिलांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दर्शना आणि राहुल दोघे सकाळी सव्वासहा वाजता किल्ले राजगडावर जाताना एकत्रित दिसत होते. परंतु परत येताना पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास तो एकटाच दिसून आला होता. त्यामुळे राहुल याच्यावर संशय बळावला होता. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि हत्यारे अद्याप जप्त केलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

Related Posts

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?
जळगाव

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

May 28, 2026
अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !
क्राईम

अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !

May 28, 2026
बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !
क्राईम

बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !

May 28, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

देवगिरी बँक फसवणूक प्रकरण गाजलं : माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या मेव्हण्याला बेड्या !

May 28, 2026
रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार
राज्य

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026
मीटर बदलण्यासाठी ‘पाच हजारांचा फटका’ ; जळगावात महावितरणवर लूटमारीचे आरोप
क्राईम

मीटर बदलण्यासाठी ‘पाच हजारांचा फटका’ ; जळगावात महावितरणवर लूटमारीचे आरोप

May 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

May 28, 2026
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशनकडून अभिवादन !

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशनकडून अभिवादन !

May 28, 2026
अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !

अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !

May 28, 2026
बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !

बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !

May 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group