भडगाव : प्रतिनिधी
जळगाव येथे दि.१० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात खान्देश प्रेरणा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.
सोहळ्यात भडगाव येथील बालविकास प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या उपशिक्षिका कु.पूजा अवधुत कासार यांना शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी स्व-रक्षण प्रशिक्षण वेबिनार राबवून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पोलीस बॉईज संघटने तर्फे खान्देश प्रेरणा पुरस्कार २०२२ श्री स्वामी समर्थ संस्थेच्या संचालिका तथा श्री स्वामी समर्थ प्राथमिक विद्यामंदिर कुसुंबा शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा पाटील मॅडम व हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या संचालिका भारती काळे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यांना मौलाना आझाद फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला श्री स्वामी समर्थ संस्थेचे अध्यक्ष, ग.स.सोसायटी लोकसहकार गटाचे अध्यक्ष मनोज पाटील, दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा.वासुदेव पाटील, रेड क्रॉस सोसायटीचे जी.टी. महाजन, पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष कुणाल मोरे उपस्थित होते.