
जळगाव मिरर | २४ जून २०२३
सध्या तरूणामध्ये सोशल मिडीयातील अनेक व्हिडीओमुळे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात, पण काही तरुण यात तलवारीने असो वा चाकूने केक कापून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात अशीच एक घटना चोपडा शहरात घडल्यानंतर पोलिसांनी लागलीच तरुणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहरातील एका रस्त्यावर तलवारीद्वारे केक कापून जल्लोष करणार्या तरुणाईला चोपडा पोलिसांनी कारवाई करीत त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली. या कारवाईन शहरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणाच्या वाढदिवसानिमित्त रस्त्यावर तलवार आणून केक कापला जात असल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी हवालदार निलेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून शहरातील शेतपुरा भागातील रहिवासी सय्यद फैजल अली मझहर अली, रॉयल एजन्सी समोर मास्टर कॉलनी मधील रहिवासी शाकीर सय्यद साबीर अली, दानिश सय्यद साबीर अली, शेतपुरा भागातील रहिवासी रीजवान अली अयाज अली, मास्टर कॉलनीमधील रहिवासी दानिश शेख हमीद शेख, के.जी.एन कॉलनीमधील रहिवासी बाबू लोहार निजाम लोहार, चुनार अळी जबरे राम मंदिर परिसरातील रहिवासी साजीद शेख गफ्फार आणि फकीरवाडा मधील रहिवासी शोएबशाह जाकीर शाह या आठ संशयित आरोपींविरोधात चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यात वापरलेली दोन हजार रुपये किंमतीची शोएब शाह जाकीर शाह (रा. फकीरवाडा) याच्या घरात आढळून आल्याने ती जप्त करण्यात आली तर आठ आरोपींविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यातीत सात संशयितांना अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप भोई करीत आहेत.





















