भडगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरात राहणार २४ वर्षीय तरूणाला संर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजू पंडीत पाटील (वय-२४) रा. भडगाव पेट, भडगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, १३ एप्रिल रोजी राजू पाटील हा वडजी शिवारातील त्यांच्या शेतात गेला होता. शेतातील बांधावर गवत कापत असतांना त्याच्या पायाला पायाला सापाने दंश केला. त्याला अत्यवस्थ वाटत असल्याने शेतातील काम करणाऱ्या नातेवाईकांनी खासगी वाहनाने भडगाव ग्रामीण रूग्णाालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार कैलास गिते करीत आहे.