जळगाव मिरर | २ जुलै २०२३
फैजपुर तालुक्यातील एका ३२ वर्षीय महिलेला वेळोवेळी लग्नाचे आमिष देत यासह फैजपूर तालुक्यातील अनेक हॉटेल्स मध्ये नेत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हे दाखल झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फैजपूर तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह वास्तव्यास असलेल्या 32 वर्षीय महिलेला 2017 पासून तर आजपर्यंत वेळोवेळी लग्नाचे आमिष देत तिच्यावर वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या मनाविरुद्ध अत्याचार करीत त्यातून तीन वेळेस गर्भवती राहिली असता तिच्या तिला आयुर्वेदिक गोळ्या देऊन गर्भपात केला या प्रकरणी संशयित आरोपी रामचंद्र वाघोदे याच्या विरोधात फैजपूर पोलीस स्थानकात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.जे.शेख हे करीत आहे या प्रकरणी संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तर दुसरी घटना जामनेर तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय मुलीवर एका महिलेच्या घरात नेवून वारंवार अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयित महिला ज्योती चौधरी व सोनू बाळू पडोळ (रा.जामनेर तालुका) यांच्याविरोधात गुन्हा जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन तरुणीला संशयित सोनू पडोळ याने मुलीच्या अल्पवयीन पणाचा फायदा घेत बदनामी करण्याच्या धमकीने तसेच तिच्या आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत ज्योती चौधरी हिच्या घरी नेत तिच्यावर अत्याचार केला. जानेवारी 2023 मध्ये दोन वेळा व एप्रिल 2023 मध्ये एक वेळा अत्याचार करण्यात आल्याचे पीडीतेने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोस्कोन्वये गुन्हा दाखल केला असून संशयित सोनू बाळू पडोळ यास अटक केली आहे. तपास पोलीस उपअधीक्षक धनंजय येरूळे करीत आहेत. या प्रकरणी दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तर तिसऱ्या घटना फैजपूर तालुक्यातील एका २६ वर्षीय विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून गेल्या काही दिवसापासून विवाहितेवर वेगवेगळ्या ठिकाणी नेत अत्याचार केला. यातून पिडीता गर्भवती राहिल्यानंतर गर्भपात करण्यास पाडून लग्नास नकार देणाऱ्या तरूणाविरुद्ध फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजपूर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २६ वर्षीय विवाहितेला गेल्या काही दिवसापासून संशयित सर्फराज सईदखान (वय २४) याने महिलेला लग्न झालेले असतांनाही तिला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच तिच्याशी सुमारे सहा महिन्यापासून फैजपूर व जळगाव येथे लॉजवर नेत वेळो-वेळी अत्याचार केला. यातून पिडीता गर्भधारण झाल्यानंतर सर्फराजने गर्भपात करण्यात भाग पडून लग्न करण्यास नकार दिला. यामुळे पिडीतेने फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल केला असून पुढील उप विभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे हे करीत आहेत.