• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव जिल्ह्यात पावसाचा मोठा फटका : पुराच्या पाण्यात तीन जण गेले वाहून !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 6, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य
0
जळगाव जिल्ह्यात पावसाचा मोठा फटका : पुराच्या पाण्यात तीन जण गेले वाहून !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ जुलै २०२३

राज्यात बदलत्या हवामानामुळे काही भागात जोरदार पावसाचे आगमन मध्यरात्री झाले पण जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मुसळधार पावसाने मोठे नुकसान देखील केले आहे. दि.५ रोजीच्या रात्री जोरदार कोसळलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना अचानक पूर आला असून रावेर तालुक्यात तीन जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर रावेर शहरातील दोन जण बेपत्ता आहेत. यात बेपत्ता असलेल्यांमध्ये रावेर शहरातील एका माजी नगरसेवकाचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील काही भागात झालेल्या पहिल्या पावसाने मोठी दाणादाण उडाली असून रावेर तालुक्यात बुधवारी रात्री अचानक पावसाला सुरुवात झाली. अचानक पावसाने जोर पकडला आणि दोन ते तीन तास मुसळधार पावसाने तांडव केला. यात रावेर तालुक्यातील नागझिरी, अभोडा आणि मात्रान या नद्यांना पूर आल्याने एकच धावपळ उडाली. यात रावेर शहरातील माजी नगरसेवक यांच्यासह एक जण दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. हे दोघे बेपत्ता झाले आहेत. तर मोरव्हाल येथील अभोडा नदीत एका जणाचा मृत्यू झाला आहे. मोरव्हाल येथे बाबुराव रायसिंग बारेला याचा मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. तर इतर दोघांचा रात्रीपासून शोध सुरू आहे. दोघे ज्या दुचाकीवरून जात होते ती दुचाकी आढळली असून दोघांचा मात्र अद्याप पर्यंत शोध लागलेला नाही. या घटनेनं तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

रावेर तालुक्यातील रमजीपुर, रसलपुर, खिरोदा गावांमध्ये अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच रमजीपुरमध्ये आलेल्या पुरामुळे चार गुरे वाहून गेले आहेत. दरम्यान, घरामध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच या पुराच्या पाण्यात गुरे सुद्धा वाहून गेले असून त्याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. एक चारचाकी गाडी वाहून गेली. गाडीतील प्रवासी यांनी वेळीच गाडीतून उडी घेत ते बाहेर पडल्याने सुदैवाने सर्व प्रवासी बचावले आहेत. दरम्यान याठिकाणी रात्रीपासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने बचावकार्य सुरु असून नागरिकांचे प्राण वाचविण्यात आले. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून बेपत्ता नागरिकांचा तपास तसेच मदतकार्य करण्याचे काम सुरू आहे. रावेर तालुक्याचे तहसीलदार बंडू कापसे नुकसानग्रस्त भागातल्या नागरिकांच्या संपर्कात आहेत. महसूल प्रशासन तालुक्यात अजून कुठे नुकसान झाले आहे? याचा शोध घेत आहेत. सदर नुकसानीचे पंचनामे करून अंतिम अहवाल देण्याचे काम सुरू आहे.

Related Posts

अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !
क्राईम

अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !

May 28, 2026
बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !
क्राईम

बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !

May 28, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

देवगिरी बँक फसवणूक प्रकरण गाजलं : माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या मेव्हण्याला बेड्या !

May 28, 2026
रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार
राज्य

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026
विवाह मंडपातच पोलिसांची एन्ट्री, अन् बालिकांचे वाचले आयुष्य
जळगाव

विवाह मंडपातच पोलिसांची एन्ट्री, अन् बालिकांचे वाचले आयुष्य

May 28, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
जळगाव

या राशीत जन्मलेल्या प्रॉपर्टी डीलर्ससाठी आजचा दिवस खूप चांगला असेल.

May 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !

अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !

May 28, 2026
बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !

बकरी ईदपूर्वी पोलिसांचा अॅक्शन मोडवर : रसलपूरसह सीमाभागात कडक बंदोबस्त !

May 28, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

देवगिरी बँक फसवणूक प्रकरण गाजलं : माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या मेव्हण्याला बेड्या !

May 28, 2026
रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group