
जळगाव मिरर | १० जुलै २०२३
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नुकतेच ९ वर्ष पूर्ण झाल्याने भारतीय जनता पार्टीतर्फे देशाभरात विविध सामाजिक उपक्रम राबवून हे वर्ष साजरे केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून जळगाव शहरात देखील माजी उपमहापौर तथा नगरसेवक डॉ.अश्विन सोनवणे यांच्या माध्यमातून शहरातील पहिल्या टप्यात मनपाच्या शाळेतील शेकडो विद्यार्थिना वहीचे वाटप आज करण्यात आले आहे.
शहरातील पिंप्राळा परिसरातील हुडको शिवारात असलेल्या मनपाच्या मौलाना अबुल कलाम आजाद, तर पिंप्राळ्यातील मनपा शाळा क्र.४८ मधील शाळेतील शेकडो विद्यार्थिना आज दि.१० रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास डॉ.अश्विन सोनवणे, सौ.सपना सोनवणे, अरविंद देशमुख, नगरसेविका दीपमाला काळे, नगरसेविका शुचिता हाडा, माजी नगरसेवक मनोज काळे यांच्या प्रमुख उपस्थिती वाटप करण्यात आल्या तर यावेळी कार्यक्रमास भाजपा महिला कार्यकर्त्या रेखा कुलकर्णी, रेखा पाटील, दीप्ती चिरमाडे, नंदिनी दर्जी, सुवर्णा पाटील, संगीता पाटील, लता बाविस्कर, तृप्ती पाटील, राहुल मिस्तरी, आकाश पारधे, शिवा पाटील, जितु सपकाळे, मनोज चव्हाण, आसिफ सय्यद यांची उपस्थिती होती.





















