जळगाव मिरर | १३ जुलै २०२३
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नुकतेच ९ वर्ष पूर्ण झाल्याने भारतीय जनता पार्टीतर्फे देशाभरात विविध सामाजिक उपक्रम राबवून हे वर्ष साजरे केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून जळगाव शहरातील माजी उपमहापौर तथा नगरसेवक डॉ.अश्विन सोनवणे यांनी चक्क एक आठवडाभर शहरातील प्रत्येक शाळेत जावून आपल्या हाताने प्रत्येक विद्यार्थिना वहीचे वाटप केले आहे.
शहरातील हरीविठ्ल नगर परिसरात असलेल्या जिजामाता विदयालयात तब्बल ७०० विद्यार्थी व विद्यार्थिनी नुकतेच वही वाटप करण्यात आले. या शाळेत गोरगरीब, तसेच हातमजुरी करणाऱ्या पाल्यांचे मुल या शाळेत शिक्षण घेत असून त्यांच्या शैक्षणिक स्वरूपात थोडा हातभर लागावा या हेतून माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी पुढाकार घेत वहीवाटप केले आहे. या प्रसंगी सौ सपना सोनवणे, सौ.शुभांगी बिऱ्हाडे, अनिल बिऱ्हाडे, अर्जुन सोनवणे, राहुल मिस्तरी, आकाश पारधे, पिंटु बारी, मनोज चव्हाण, जितु सपकाळे, आसिफ सय्यद यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
विद्यार्थीच्या शिक्षणावर माजी उपमहापौरांची तत्परता !
शहरातील अनेक गोरगरीब विद्यार्थीच्या शिक्षणावर माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे हे तत्परता दाखवीत प्रत्येक शाळेत जावून प्रत्येक विद्यार्थीची आपुलकीने विचारपूस करीत शैक्षणिक काळात येणाऱ्या अडीअडचणीबाबत विचारपूस करीत हवी असलेली मदत करीत असतांना माजी उपमहापौर सोनवणे हे गेल्या आठवडाभरापासून दिसत आहे.
