
जळगाव मिरर | १४ जुलै २०२३
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील राजूर घाटात एका ३५ वर्षीय महिलेवर ८ नराधमांनी चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला ही तिच्या नातेवाईक व्यक्तीच्या एका मित्रासोबतच घाटातून दुपारी जात होती. सेल्फी काढण्यासाठी ते थांबले असता, त्यांच्या गळ्याला चाकू लावून आरोपींनी पीडित महिलेला देवीच्या मंदिरामागील दरीत नेले. तेथे आरोपींनी पीडितेवर आळीपाळीने बलात्कार केल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आरोपींनी फिर्यादीच्या खिशातील ४५ हजार रुपयेदेखील लुटले.






















