जळगाव मिरर | १५ जुलै २०२३
जळगाव शहरातील रेल्वेस्थानकाच्या फलाटा क्र.४ वर एक मालगाडी थांबली असताना एका अनोळखी ५० वर्षीय इसमाने यागाडीच्या डब्यावर चढला असून त्याला हाय व्होल्टेजचा विद्युत शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. १४ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हा प्रकार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रेल्वे स्थानकावरील फलाट क्र.४ वर दि. १४ जुलै शुक्रवार रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक ४ वर एक मालगाडी उभी असतांना एक अनोळखी व्याक्तिने मालगाडीच्या डब्यावर चढला असता त्याचा विद्युत तराणा स्पर्श झाल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना घडली . याचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले असून या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.