जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कुसुंबा येथील ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, कुसुंबा येथील किशोर चौधरी हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. एमआयडीसीतील एका दाल मिलमध्ये ऑपरेटर म्हणून कामाला होते. सध्या गेल्या पाच महिन्यांपासून ते घरी होते. शुक्रवारी १५ एप्रिल रोजी दुपारी घरात कुणीही नसताना छताला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. दुपारी दीड वाजेच्या सुमारास लहान भावाची पत्नी ही घरी आल्या तेव्हा प्रकार लक्षात आला. मोठ्या भावासह शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या मदतीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.