भुसावळ : प्रतिनिधी
तरुण राष्ट्राचे भवितव्य असले तरी वृद्धांना भूतकाळ म्हणणे योग्य ठरणार नाही कारण वृद्ध हे अनुभवाचे गाठोडे आहे. समाजातील आणि कुटूंबातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे कौशल्य वृद्धांमध्ये असते. देशाची आणि समाजाची समृद्धी, संस्कृती आणि आदर्शत्वाची उंची ही ज्येष्ठ नागरिकांवर अवलंबून असते. ज्येष्ठ नागरिक हे समाजासाठी आधारवाडच आहे.रघुनाथ आप्पांचा या वयातील उत्साह आणि सामाजिक कार्य तरुणांना दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन अमोल हरिभाऊ जावळे यांनी केले.
बुधवारी अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रघुनाथआप्पा सोनावणे यांचा त्यांच्या सामाजिक कार्याची दाखल घेत सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.सन्मान पत्र, शाल आणि पुस्तक देऊन त्यांचा सत्कार या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अमोल हरिभाऊ जावळे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी उपस्थित होते.अमितकुमार पाटील यांचा विशेष सत्कार या प्रसंगी करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन शैलेंद्र महाजन यांनी केले.कार्यक्रमाचे आभार अमित चौधरी यांनी मानले.या प्रसंगी या प्रसंगी शिक्षण तज्ञ डॉ.संजू भटकर, ग.स.जळगावचे माजी तज्ञ संचालक योगेश इंगळे, राकेश कोल्हे, प्रदीप सोनवणे, प्रा.श्याम दुसाने, समाधान जाधव , राजू वारके, भूषण झोपे, निवृत्ती पाटील, मंगेश भावे, सचिन पाटील, अविनाश तायडे आणि अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील उपस्थित होते.