
जळगाव मिरर | २६ जुलै २०२३
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील दांडेकर नगरातील रहिवासी असलेल्या जयंत पाटील यांची कन्या घोषिता पाटील हिने इयत्ता नववी वर्गात शिकत असून, ही अनुभूती हायस्कूलची विद्यार्थिनी आहे.
तिचे वडील अंध असून तिला तिच्या वडिलांकडून प्रेरणा मिळालीकेरळला जाऊन रायफल शूटिंग मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. इतक्या कमी वयात तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करून महाराष्ट्राचे नाव लौकिक केलेल आहे. त्यानिमित्ताने तिचे संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. उपस्थित जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, महानगराध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मयूर चौधरी, गोपाल पाटील, प्रफुल पाटील, राजेश पाटील,राहुल पाटील, संदीप मांडोळे, गणेश पाटील हे उपस्थित होते.





















