
जळगाव मिरर | २६ जुलै २०२३
जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील धर्मरथ फाउंडेशनतर्फे इंदिराबई पाटणकर मराठी शाळा येथे दि.२० रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण दि.२५ रोजी सकाळी ९ वाजता करण्यात आले.
त्याप्रसंगी शाळेतील 9 विद्यार्थ्यांना बक्षिसाच्या स्वरुपात शालेयोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच शाळेतील इतर विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून पेन्सिल चे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत आगलावे यांनी केले. त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक कैलास तायडे, मीनाक्षी चौधरी, माधुरी वानखेडे, धर्मरथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील, संतोष भिताडे, बाबू शेख, अकील पहेलवान, तुषार सूर्यवंशी, आफिस खान, निशांत पाटील, अकील पटेल, महेश राठी, महेश चौधरी इतर मान्यवर उपस्थित होते.





















