
जळगाव मिरर | २६ जुलै २०२३
जळगाव जिल्ह्यातील अनेक गावातून महिलासह अल्पवयीन युवतींना पळवून नेल्याचे प्रमाण मोठ्या संख्येने घडत असतांना पुन्हा एकदा जळगाव तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेल्याचा प्रकार २४ जुलै रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमोल मोरे करीत आहे.





















