जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२३
देशाचा 76 वा स्वातंत्र्य दिन नुकत्याच दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यानिमित्त जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी मधुदत्त मॅटरनिटी व नर्सिंग होमचे डॉ.दिलीप राणे व डॉ. तेजस राणे यांनी एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे.
या आरोग्य तपासणीमध्ये डॉ.तेजस राणे यांच्या संयोजनातून थायरॉईडची तपासणी, कोलेस्ट्रॉल Lipid Profile किडनीचे घटक उपाशीपोटीची साखर तीन महिन्याची साखर विटामिन D3 नसांची चाचणी लिव्हरच्या घटकाची तपासणी व हाडांच्या घनता चाचणी यासह तज्ञ फिजिशियन यांचा सल्ला देखील यावेळेस ७६ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केवळ ७६० रुपयात मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून डायबिटीज बीपी थायरॉईड हृदयविकार व इतर आजारांवर डॉ. तेजस राणे यशस्वी काम करीत असून यासह यशस्वीरित्या अनेक रुग्णावर उपचार करीत आहे. सदरील शिबीर ५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ८ ते १ वाजेपर्यंत (ज्यांना या शिबिरात तपासणी कार्याची असेल त्यांनी उपाशी पोटी यावे.) या शिबिरासाठी जर आपल्याला तपासणी करायची असेल तर 0257_ 2239300,७०४९३६९३६५ किंवा जळगाव शहरातील नेरी नाका जवळ असलेल्या ४७ सरस्वती नगरातील मधुदत्त हॉस्पिटल येथे रुग्णालयात भेट देऊन नाव नोंदणी करावी.
(वाणिज्य वार्ता)
