जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरअनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी नशीराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्गावरील शिवशक्ती कारबाजारसमोर रस्त्यालगत अनोळखी पुरूषाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती नशीराबाद पोलिसांना नागरिकांनी कळविली. त्यानुसार पोलिसांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. मयताचे अंदाजे ३५ ते ३८ वर्ष असे असून त्यांची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी नशीराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिल मोरे हे करीत आहेत.