
चाळीसगाव : कल्पेश महाले
चाळीसगाव तालुक्यातील करंजगाव ग्रामपंचायतमध्ये २२ लाखांचा अपहार केल्याची फिर्याद दिल्यावरून न्यायालयाच्या आदेशाने माजी ग्रामसेवक, माजी सरपंच, उपसरपंच अशा तीन जणांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील करंजगाव येथील सेवानिवृत्त रहिवासी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की करंजगाव ग्रामपंचायतीमध्ये २००८ ते २०२३ या कालावधीमध्ये संगणमताने वेळोवेळी शासनाकडून येणाऱ्या विविध योजनांची माहिती गोरगरीब जनतेला न पोहोचविता यायोजनांमध्ये शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचा अपहार वभ्रष्टाचार करून गोरगरीब जनतेची व शासनाची दिशाभूल करून २२ लाख १२ हजार ७११ रुपयांचा अपहार व फसवणूक केल्याची तक्रार न्यायालयात केली होती.. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.





















