अमळनेर : प्रतिनिधी
येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे मंगळग्रह मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त १६ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा अतिशय मंगलमय व चैतन्यदायी वातावरणात साजरा झाला. शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख विष्णुभाऊ भंगाळे व त्यांच्या पत्नी संगीता भंगाळे या दाम्पत्याच्या शुभहस्ते पंचामृत अभिषेक, लघुरुद्र, हनुमान जन्मोत्सवाचे पूजन झाले. आचार्य केशव पुराणिक व प्रसाद भंडारी यांनी पौरोहित्य केले.
याप्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजीनदार गिरीश कुलकर्णी यांच्यासह मंदिरातील सेवेकरी विनोद कदम, ए.डी.भदाणे, पुशंद ढाके, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय कौतिक पाटील, सुंदरपट्टीचे सरपंच सुरेश पाटील आदी उपस्थित होते. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून विशेष टोप्या (अंपायर कॅप) सेवेकऱ्यांना भंगाळे यांच्या हस्ते मंगळग्रह सेवा संस्थेने वितरित केल्या. हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धणे व गुळ असलेला विशेष प्रसादाचे मोठ्या प्रमाणावर भाविकांना वाटप करण्यात आले. दरम्यान सकाळपासूनच मंदिरात भाविकांची रीघ लागली होती.