मुक्ताईनगर :प्रतिनिधी
नुकत्याच गोदावरी आय .एम .आर. कॉलेज जळगाव येथे संपन्न झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उ.म. विद्यापीठ अंतर्गत जळगाव विभागाच्या आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेत श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालय मुक्ताईनगरचे दोन्ही म्हणजे पुरुष व महिला बॉल बॅडमिंटन संघ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत विजयी झाले. संघात पंकज खिरोडकर(कर्णधार) सिद्धांत बोदडे, राहुल बोदडे, विशाल दुट्टे, अनुराज बोदडे यांनी व मुलींमध्ये मीनाक्षी घुले (कर्णधार), पूनम मेढे जान्हवी माळी, श्रद्धा गिरी, भाग्यश्री जयकर, राजश्री पाटील प्रेरणा बोरसे यांनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करून प्रथम क्रमांकाचे जेतेपद पटकावून महाविद्यालयाच्या गौरवात मानाचा तुरा रोवला. सदर दोन्ही संघांना प्रा. डॉ. प्रतिभा ढाके, तसेच सागर नानोटे, किरण लोहार यांनी मार्गदर्शन केले.
दोन्ही संघाच्या या यशाबद्दल मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा मा. अँड. रोहिणी ताई खडसे-खेवलकर, उपाध्यक्ष मा. नारायण चौधरी, सचिव मा.डॉ. सी. एस् .चौधरी,प्र. प्राचार्य मा.डॉ.हेमंत महाजन उपप्राचार्य मा.डॉ. ए. पी. पाटील, प्राध्यापक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.