धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील रोटवद गावाजवळ दुचाकी अपघातात दोन ठार तर दोन जखमी झाल्याची घटना रात्री घडली जखमींना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील रहिवासी प्रभाकर सूर्यवंशी हे आपल्या आई आणि दोन मुलांसह नातेवाईकाच्या भेटीसाठी धरणगाव जवळ एका गावात आले होते. त्यानंतर परतीचा प्रवास करताना धरणगाव तालुक्यातील रोटवद जवळ रात्री ८ वाजेच्या सुमारास दुचाकीने जात असताना सूर्यवंशी यांचा दुचाकीवरील ताबा सुटला व समोरून जात असलेल्या बैलगाडीला जोरदार धडक झाली. या धडकेत प्रभाकर सूर्यवंशी व त्यांची सात वर्षाची मुलगी नायरा यांचा जागीच मृत्यू झाला तर आई आई आणि मुलगा हे गंभीर जखमी आहेत जखमींना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेतली होती.