जळगाव मिरर । १७ ऑगस्ट २०२३
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार यांच्यासह काही आमदार शरद पवार यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले त्यानंतर अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचा दौरा सुरू केला असून पहिली सभा येवला येथे झाली तर आज बीड येथे झालेल्या सभेत शरद पवारांनी अजित पवारांचं अनेक आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले की, बीडमध्ये गेल्या काही दिवसापासून काय झालंय काही समजत नाही कुणीतरी आमचा सहकारी पक्ष सोडून गेला असे एका नेत्याने सांगितलं तर कालपर्यंत सर्व ठीक होतं पण काय झालं म्हणून चौकशी केली असता तेव्हा समजलं कुणीतरी सांगितलं की शरद पवारांचं वय झालंय त्यामुळे आपल्याला भवितव्याचा विचार करून दुसरा नेता निवडला पाहिजे. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की माझं वय झालं म्हणता तुम्ही माझं काय बघितलं आहे त्यामुळे तुम्हाला सामूहिक शक्ती उभी केल्यावर काय होतं हे या जिल्ह्यातील जनतेच्या पाठिंबावर आम्ही एकदा दाखवून दिला आहे इथल्या तरुण पिढीच्या मदतीने अनेक दिग्गज यांना पराभव इथं झाला आहे असं देखील शरद पवार म्हणाले.