बोदवड : प्रतिनिधी
तालुक्यात एका गावात राहणारी अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, बोदवड तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय मुलगी १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मुलगी ही घरी एकटी असताना अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेले. दरम्यान ही माहिती घरच्या नातेवाईकांना मिळाल्यानंतर त्यांनी परिसरासह त्यांच्या नातेवाईकांकडे आणि तिच्या मैत्रिणींकडे शोधाशोध सुरू केली. सायंकाळपर्यंत मुलगी कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी बोदवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अय्युब तडवी करीत आहे.