जळगाव मिरर | २५ ऑगस्ट २०२३
शहरातील आव्हाने शिवारातील एका परिसरात महिलेसोबत दोन जणांमध्ये वाद झाला असून याकारणावरून महिला ही घरी बसलेली असतांना परिसरातील काहींनी चुकीचे वर्तन करून मारहाण करत विनयभंग करत धमकी दिल्याची घटना बुधवारी २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका भागात असलेल्या महिलेचे व त्याच भागातील दोन जणांमध्ये बुधवारी २३ ऑगस्ट रोजी सकाळी वाद झाला होता. त्यानंतर ही महिला तिच्या बहिणीसह संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घराबाहेर बसलेली होती. त्यावेळी सकाळी झालेल्या वादातून त्यांच्या घरासमोर राहणारा एक जण त्याच्या भावासह अन्य सहा जणांना घेऊन आला. दोघी भावांनी महिलांशी गैरवर्तन करीत त्यांचा विनयभंग केला. या दोघांसह अन्य सहा जणांनी लाकडी काठ्यांनी मारहाण करीत धमकी दिली. या सोबत त्यांच्या दुचाकीचे नुकसान करीत घराच्याही काचा फोडल्या. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि अनंत अहिरे करीत आहेत.