मुक्ताईनगर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद केंद्रीय पूर्ण प्राथमिक शाळा नं.१ जुने गाव मुक्ताईनगर येथे आ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शाळापूर्व तयारी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शाळापूर्व तयारी दिनानिमित्ताने आ. पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले व कार्यक्रमाची फीत कापली. यावेळी बोलताना ते म्हणाले ही शाळा माझी शाळा आहे येथेच मी प्राथमिक शिक्षण घेतले स्वप्नातील एक आदर्श शाळा हिस्टॉटिकल हेरिटेज, व मॉडेल स्कूल साठी भरीव निधी प्राप्त करून मंजुरीसाठी पाठपुरावा शासन दरबारी सुरू असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. इंग्रजी माध्यमांच्या शाळांप्रमाणे माझीही मराठी शाळा समृद्ध व्हायला पाहिजे व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता गुणवत्ता वाढली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पूर्वीचे शाळांचे सोनेरी दिवस परत येतील अशी आशा व्यक्त केली. लहान बालकांसाठी नेहमी प्रयत्न करणाऱ्या अंगणवाडी सेविकांची पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. दरम्यान तालुक्यात शिक्षकांची रिक्त पदे भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत, मतदारसंघ शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत सुजलाम सुफलाम झाला पाहिजे अशी अपेक्षा आ. पाटील यांनी व्यक्त केली.
या वेळी सोबत तालुकाप्रमुख छोटूभाई शहर प्रमुख गणेश टोंगे दिलीप पाटील सर साहेब प्रशांत पाटील तसेच गटशिक्षणाधिकारी बि.डी धाडी , शिक्षण विस्तार अधिकारी आर.आय तडवी, केंद्रप्रमुख हिरालाल भाई, ग्रेड मुख्याध्यापक धनलाल भोई ,सुनील आढागळे. व सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि आंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होते, धनलाल भोई यांनी आभार मानले.