जळगाव : प्रतिनिधी
जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेषदादा पाटील यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याचे आज दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास उघड झाले आहे.
जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान, एकीकडे खासदार पाटील हे दौर्याच्या नियोजनात असतांनाच त्यांचे @UnmeshPatilBjp हे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याचे दिसून आले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जळगाव विमानतळावरून शहरात येत होते.
खासदार उन्मेष पाटील हे ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. मात्र दुपारपासून त्यांच्या अकाऊंटचा ताबा हा हॅकर्सनी घेतल्याचे दिसून येत आहे. खासदार उन्मेष पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
