चाळीसगाव :प्रतिनिधी
चाळीसगावसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड विद्वत्ता आहे त्याचा उपयोग अशा स्पर्धांमध्ये भाग घेऊन सिद्ध केली पाहिजे आणि याच विज्ञानाचा उपयोग शेती व्यवसायासाठी कसा करता येईल याचा सुद्धा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. कारण जग फार वेगाने बदलत आहे आणि आपणास सुद्धा बदलणं गरजेचं आहे, असे प्रतिपादन राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन विज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धेच्या उदघाटन समारंभ प्रसंगी उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी केले.
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी. पी. आर्टस, एस. एम. ए. सायन्स अेॅड के. के. सी. काॅमर्स काॅलेज आणि के. आर. कोतकर ज्युनिअर काॅलेज चाळीसगाव मध्ये कै.मांगीलाल गोवर्धनदास अग्रवाल २९ वे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन विज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धेचे उदघाटन चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी मा. लक्ष्मीकांत साताळकर यांच्या शुभ हस्ते पार पडले. उदघाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन मा. नारायण अग्रवाल हे होते.
याप्रसंगी सिनिअर काॅलेज कमिटीचे चेअरमन डॉ. एम.बी.पाटील, अेॅड. प्रदीप अहिरराव, मा. राजेंद्र चौधरी, प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर, विज्ञान मंडळ प्रमुख डॉ. विजय बाविस्कर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. उदघाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांनी प्रस्ताविक केले. विज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धेसंदर्भात प्रास्ताविक विज्ञान मंडळ प्रमुख डॉ. विजय बाविस्कर यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. पूनम निकम व प्रा. मनीषा सूर्यवंशी यांनी केले. आभार उपप्राचार्य डॉ. अजय काटे यांनी मानले.