
जळगाव मिरर | २९ सप्टेंबर २०२३
राज्यभर गणपती बाप्पांच्या विसर्जन नुकतेच गुरुवारी रात्री उशिरापर्यत सुरु असतांना जळगाव शहरातील देखील गणेशभक्तांचा उत्साह दिसून आला यावेळी मात्र दि.२८ रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील कोर्ट चौकात मंडळांच्या वाहनांच्या रांगा लावल्याच्या कारणावरून काही मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यानंतर हाणामारीत याचे रुपांतर झाले. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंत चतुर्दशीच्या दिवशी जळगाव शहरातील प्रमुख मंडळाची भव्य मिरवणूक निघत असल्याने आदल्या दिवशी रात्रीच्या सुमारास कोर्ट चौकात मिरवणूकीत रांग लागण्याच्या कारणावरून काही कार्यकर्ते हुज्जत घालत होते. यावेळी शहर पोलिसांनी हस्तक्षेप करीत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. पोलिस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ७ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आयुष गांधी, कैलास नारायण सोनवणे, कल्पेश कैलास सोनवणे, गौरव साकला, गोविंद पंडित, अजय गांधी, सागर भीमराव सोनवणे सर्व राहणार जळगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक फौजदार संगीता खांडरे करीत आहेत.




















