अमळनेर : विक्की उत्तम जाधव
हिंदू संस्कृतीत नवरात्रीचा सण अतिशय महत्त्वाचा असतो.. नवरात्र काळात देवी व तिच्या विविध रूपांची पूजा केली जाते ..नवरात्रीची सुरुवात घटस्थापने पासून होते.. घटस्थापनेला नव्या दिवशी नववीला पत्रकार ईश्वर महाजन यांच्यावतीने विदयाविहार मित्र मंडळ अमळनेर येथे ९ दुर्गाचा सत्कार व विदयाविहार मित्र मंडळाचा सत्कार, दुर्गा सपाशती पाठाचे वाचन करणाऱ्या महीलांचा सत्कार करण्यात आला..
नऊ दुर्गाचा सत्कार केला.
विदयाविहार कॉलनी मित्र मंडळाचे आयोजक प्रवीण रमेश पाटील, अध्यक्ष जयंत पाटील, उपाध्यक्ष योगेश शिरसाठ, सचिव मोहित पवार, सदस्य सागर विसपुते, विजुभाऊ येवले, दिनेश पाटील, भूषण पाटील ,संजय पाटकरी, प्रशांत देसाई, किरण आहिरे, कवीश पाटील अमोल दुसाने,किरण आहिरे, विवेक पाटील, सनी पाटील, स्वप्निल पाटील यांचा सत्कार मिलिंद संदानशिव, आर.डी शिंदे,विकास शेलकर, ईश्वर महाजन यांनी शाल,श्रीफळ, बुके देऊन करण्यात आला. सप्त दुर्गा सपाशती पाठाचे उत्कृष्ट वाचन करणाऱ्या सौ सुनिता शिंदे,सौ किर्ती शेलकर यांचा सत्कार सौ माधुरी पवार, सौ सुषमा पाटील यांनी श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन केला..
*या ९ दुर्गाचा झाला सन्मान*
काव्या प्रविण पाटील, आर्या कल्पेश पाटील, प्रणाली प्रमोद पवार, आर्या विकास शेलकर, खुशी अमोल सुर्यवंशी, आर्या प्रशांत देसाई, प्रिती जाधव,नेहा शिंगाणे, आरूषी पाटील या ९ दुर्गाना
भेटवस्तू व राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक, गुलाबपुष्प देऊन सौ ज्योती माळी,सौ बबीता पवार, सौ ज्योती पवार,सौ वैशाली गोसावी, सौ किर्ती शेलकर, श्रीमती शर्मिला पाटील,सौ सुनिता शिंदे,सौ निर्मला पाटील यांनी सत्कार केला.
विदयाविहार काँलनीतील अत्यंत खेळामेळीच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. गरबा खेळतांना बंधू व भगिनी यांनी मनसोक्त आनंद घेतला.सागर विसपुते यांनी उत्कृष्ट सुत्रसंचालन केले.विदयाविहार काँलनीतील सर्व बंधू भगिनी यांनी ९ दिवसाच्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.
विदयाविहार मित्र मंडळाच्या वतीने पहील्या वर्षी अनेक शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविण्यात आली. विदयाविहार काँलनीतील सर्व बंधू व भगिनी यांनी सहकार्य दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो..नवरात्री उत्साहात अनेक दिग्गज मान्यवरांना आरतीचा मान मिळाला.
पत्रकार ईश्वर महाजन यांनी मंडळाचे पदाधिकारी व ९ दुर्गाचा सन्मान केला व दुर्गा सपाशती वाचन करणाऱ्या भगिनीचा सत्कार केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. मंडळाला ज्यांनी ज्यांनी आर्थिक सहकार्य केले त्यांचेही व मातोश्री मंडपाचे मालक यांचेही धन्यवाद व्यक्त करण्यात आले.