अमळनेर : विक्की उत्तम जाधव
प्रत्येक घरात पती व पत्नीचे छोट्या-मोठ्या कारणाने नेहमी भांडण होत असतात पण अमळनेर शहरातील एका परिसरातील पत्नी व पतीमध्ये झालेल्या भांडणातून थेट खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पतीविरोधात अमळनेर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अंमळनेर शहरातील एका परिसरात १ नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास पती घरी आला असता त्याने घराबाहेर बसलेली पत्नी फोनवर मुलीशी बोलत असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर पत्नीला चक्क पॅन्टच्या खिशातून चाकू सारखे धारदार हत्यार काढत तिच्या गळ्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार देखील केले आहे. यामुळे पत्नीच्या दोन्ही हातावर वार करून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पती विरोधात अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे हे करीत आहे.