जळगाव मिरर | १५ नोव्हेबर २०२३
देशभरात अपघाताची मालिका सुरु असतांना एक भीषण अपघाताची घटना जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातून समोर आली आहे. बुधवारी प्रवाशांनी भरलेली बस ३०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला. तर १९ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हि घटना जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील असार भागात हा भीषण अपघात घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बस किश्तवाडहून जम्मूला जात होती. दरम्यान, स्त्यावरून घसरून बस दरीत कोसळली. बसमध्ये 55 प्रवासी होते. घटनेनंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. हा अपघात एवढा भीषण होता की बसचा पत्रा कापून आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. बसच्या अर्ध्या भागाचा चुराडा झाला आहे. लोकांचे मृतदेह रस्त्यावर रस्त्यावर पडले आहेत. बचाव पथकाने सांगितले की, जखमींना किश्तवाड जिल्हा रुग्णालय आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, डोडा येथे दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना विमानाने जम्मूला हलवण्यात आले आहे.