जळगाव मिरर | २३ नोव्हेबर २०२३
सध्या पुणे, मुंबई आणि नागपूर येथे मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करीत आहेत. सणांच्या काळात सुट्या असल्याने अनेकजण फिरायलादेखील जात आहेत. याचा फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी मोठ्या प्रमाणात भाडेवाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर-मुंबई गाडीला जळगाव आणि चाळीसगावला अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे.
ट्रेन क्र.०२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर दि. २० नोव्हेंबरपर्यंत द्वि-साप्ताहिक होती. ही रेल्वे आता २८ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. त्यात ११ फेऱ्या आहेत. रेल्वे क्रमांक ०२१४० नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि- साप्ताहिक विशेष रेल्वे आता ३० डिसेंबर (११ फेऱ्या) पर्यंत धावणार आहे.
रेल्वे क्र. ०२१४४ नागपूर पुणे साप्ताहिक रेल्वे दि. २८ डिसेंबर (६ फेऱ्या) पर्यंत धावणार आहे. रेल्वे क्रमांक ०२१४३ पुणे-नागपूर साप्ताहिक दि. २९ डिसेंबर (६ फेऱ्या) पर्यंत मुदतवाढ आहे. रेल्वे क्रमांक ०११२७ लोकमान्य टिळक टर्मिनस- बल्लार शाह साप्ताहिक रेल्वे दि. २६ डिसेंबर पर्यंत धावणार आहे. रेल्वे क्रमांक ०११२८ बल्लारशाह लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. २९ नोव्हेंबरऐवजी आता दि. २७ डिसेंबर (४ फेऱ्या) पर्यंत धावणार आहे. रेल्वे क्र. ०१४३९ पुणे-अमरावती द्वि- साप्ताहिक विशेष अधिसूचित आता दि. ३१ डिसेंबर (९ फेऱ्या) पर्यंत धावणार आहे. गाडी क्रमांक ०१४४० अमरावती-पुणे द्वि-साप्ताहिक रेल्वे दि. ०१ जानेवारी २०२४ धावणार आहे.