जळगाव मिरर | २७ नोव्हेबर २०२३
देशातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना एक संतापजनक घटना मेरठमधील एका विद्यापीठात घडली आहे. शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याला काही मित्रांनी जबर मारहाण करीत त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर लघवी केल्याचा लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलीस चौकशी करून अटक देखील केले असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, मेरठमध्ये चौधरी चरण सिंह विद्यापीठातील एका विद्यार्थ्यासोबत काही दिवसांपूर्वी त्याच्या मित्रांशी वाद झाला होता. त्यानंतर 13 नोव्हेंबर रोजी त्यांचे अपहरण करून जागृती विहार एक्स्टेंशन येथे नेले. त्याठिकाणी मित्रांनी बेदम मारहाण करीत त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर लघवी केली. विद्यार्थ्यावर लघवी पिण्यासाठी दबाव टाकून जीवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर आरोपीने घटनेचा व्हिडिओ बनवला. व्हायरल करण्याची धमकी देत त्यांनी पीडित विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
घटनेची माहिती मिळताच १९ नोव्हेंबर रोजी पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी मेडिकल पोलिस ठाण्यात ७ आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला, पण आज म्हणजेच रविवारी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच त्यांनी एका आरोपीला तत्काळ अटक केली.