जळगाव मिरर | २९ नोव्हेंबर २०२६
दसऱ्याच्या दिवशी काम असल्याचे सांगून सुप्रिम कॉलनीतील टेकडीवर नेवून मारहाण केल्या कारणावरुन शुभम दिलीप धनगर (वय २२, रा. रावपूर, ता. जळगाव) या तरुणाला तिघांनी कमरेच्या पट्ट्यासह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना दि. २६ रोजी रात्री ११ वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील रायपूर येथे राहणाऱ्या शुभम धनगर या तरुणाला दि. २६ रोजी रात्री ११ वाजता संशयित पवन कोळी, पंकज कोळी व हितेश कोळी यांनी काम असल्याचे सांगून त्याला दसऱ्याच्या दिवशी सुप्रिम कॉलनीतील टेकडीवर घेवून गेले. त्याठिकाणी मारहाण केल्यानंतर शुभम धनगर याने देखील मारले होते. त्या संशयाच्या कारणावरुन त्या तिघांनी पुन्हा शुभमला चापटा बुक्क्यांसह कमरेच्या पट्टयाने मारहाण करीत जखमी केले. दरम्यान, शुभम धनगर याने दि. २७ रोजी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली असून त्यानुसार पवन कोळी, पंकज कोळी व हितेश कोळी (रा. कुसुंबा, ता जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ दीपक महाजन हे करीत आहे.





















