जळगाव मिरर | २८ नोव्हेंबर २०२३
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून अनेक वाक्ययुद्ध रंगत असताना आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.
आंबेडकर बोलताना म्हणाले कि, येत्या ६ डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, देशात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला सतर्क करण्यात आलं आहे. कुठल्याही परिस्थितीत ६ डिसेंबरनंतर देशात काहीही घडू शकतं. सध्या सुरु असलेल्या चार राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतरही काहीही घडू शकतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. छगन भुजबळ यांना जेलबाहेर काढणारा मीच आहे. मी जर न्यायाधीशांना शिव्या घातल्या नसत्या तर भुजबळ जेलबाहेर आले नसते, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं संविधानाबाबतचं वक्तव्य हे राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचं आणि सरसंघचालक मोहन भागवतांचं आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावं. 6 डिसेंबरनंतर काहीही होऊ शकतं, असा पोलिसांना अलर्ट आला आहे. 5 राज्यांच्या निवडणुका झाल्यावर देशात काहीही घडू शकतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.