जळगाव मिरर | २९ नोव्हेबर २०२३
राज्यातील राष्ट्रवादी व शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर दोन्ही पक्षाकडून एकमेकावर जोरदार हल्लाबोल सुरु असतांना असेच भाषण करणे आता ठाकरे गटाच्या एका नेत्याला चांगलेच भोवले आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्याने दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भर सभेतून शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली दळवी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर दळवी यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दळवी यांना दुपारनंतर कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती पुढे येत आहे. दळवींच्या अटकेमुळे ठाकरे गटाला चांगलाच झटका बसला असून एकच खळबळ उडाली आहे.
आज सकाळी ८ वाजता पोलिसांनी दत्ता दळवी यांना अटक केली. दळवी यांना त्यांच्या विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. दळवी यांना भांडूप येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी तक्रारीनंतर भांडूप पोलिसांनी दत्ता दळवी (Dutta Dalvi) यांच्या विरोधात भादंवि कलम 153 (अ),153 (ब),153(अ)(1)सी, 294, 504,505(1)(क) अन्वये गुन्हा दाखल केला होता. मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणीचा दुसरा गुन्हा आहे. याची भांडूप पोलिसांनी गंभीर दखल घेत दत्ता दळवी यांना अटक केली आहे. दळवी यांना अटक झाल्याने ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. दळवी यांना अटक झाल्याची माहिती मिळताच भांडूप पोलीस ठाण्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत पोहचले असून, शिवसैनिक जमण्यास सुरुवात झाली आहे. काही वेळातच त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला जाणार आहे.