जळगाव मिरर | २ डिसेंबर २०२३
जळगाव शहरासह ग्रामीण भागातून अल्पवयीन मुलींना पळवून नेल्या जात असल्याच्या अनेक घटना घडत असतांना नुकतेच जळगाव शहरातील रेल्वे स्थानकाजवळील बिग बाजार परिसरातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस एकाने पळवून नेल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.३० नोव्हेबर २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शहरातील रेल्वे स्थानक रोडवरील बिग बाजार परिसरात आली असता याठीकानाहून एक अल्पवयीन संशयित आरोपीने तिला पळवून नेल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्जेराव क्षीरसागर हे करीत आहेत.