• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

‌‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया…‌’ या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 4, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
‌‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया…‌’ या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद
Share on FacebookShare on Twitter

धुळे जिल्ह्यातील काळखेडेतील लोटन पाटील यांच्याकडून दिवाळी फराळ सुपूर्द

जळगाव मिरर | ४  नोव्हेंबर २०२६

राज्यात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यात विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसागणिक भयावह होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर येथील मंगळग्रह सेवा संस्था या सामाजिक जाणिवेचे उचित भान राखणाऱ्या संस्थेतर्फे दिवाळीपर्वाच्या सुरूवातीला ‌‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया… त्यांचे घरही आनंदाने प्रकाशमान करूया!‌’ असे आवाहन केले आहे.

या अभिनव उपक्रमास मंगळवार, दि. 3 नोव्हेंबरपासून सकारात्मक प्रतिसाद मिळणे सुरू झाले आहे. धुळे जिल्ह्यातील काळखेडे येथील मूळ रहिवासी व धुळे येथील वाडीभोकर रोडवरील डिजिटल मार्केटिंग ॲण्ड डिझायनिंग व्यवसाय करणारे लोटन शरद पाटील (कचवे) व त्यांच्या मातोश्री गं. भा. मथुराबाई पाटील यांनी आज दातृत्व आणि कर्तृत्व दाखवत माणुसकीची पणती पेटवत स्वखर्चाने आणलेला दिवाळी फराळ मंगळग्रह सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळाकडे सुपूर्द केला.

श्री. लोटन पाटील यांच्या हाती आजच अमळनेरसह जळगाव व धुळे जिल्ह्यात वृत्तपत्रांतून वितरीत करण्यात आलेले भावनिक आवाहनाचे पॉम्प्लेट वाचले. त्यानंतर तत्काळ आपल्या मातोश्रींसमवेत दिवाळी फराळ घेऊन आज श्री मंगळग्रह मंदिर मंदिर गाठले. मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव व डी. ए. सोनवणे यांनी श्री. पाटील यांनी आणलेला हा दिवाळी फराळ आदरपूर्वक स्वीकारला. त्यानंतर श्री. पाटील व त्यांच्या मातोश्रींनी जपलेल्या या सकारात्मक सेवाभावाचे विश्वस्त मंडळाकडून तोफ्लडभरून कौतुक करण्यात येऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

मंगळग्रह सेवा संस्थेला मिळतोय भरभरून प्रतिसाद आणि होतेय कौतुक
आजच (मंगळवार, दि. 3 नोव्हेंबर 2026) मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दिवाळी फराळ, नवीन कपडे किंवा सुस्थितीतील कपडे, अन्नधान्य, किराणा व जीवनावश्यक वस्तू गरजवंतांची दिवाळी गोड करण्यासाठी श्री मंगळग्रह मंदिरात आणून द्यावे, किंवा स्वतः वाटावे या स्वरूपाचे भावनिक आवाहनात्मक पॉम्प्लेट अमळनेरसह जळगाव व धुळे जिल्ह्यांत वितरीत करण्यात आले. त्यामुळे दिवसभर मंगळग्रह सेवा संस्थेच्या या अनोख्या उपक्रमाचे आणि भावनिक आवाहनाचे अनेकांकडून फोनकॉलद्वारे भरभरून कौतुक करण्यात आले. त्यात मंदिर व्यवस्थापन सांभाळणाऱ्या एका संस्थेकडून अशा प्रकारचे भावनिक आवाहन होणे, ही बाब अतिशय अभिनंदनीय व अनुकरणीय आहे, असे सांगत आम्ही दिवाळी फराळासह इतरही वस्तू मदतरूपाने देण्यास तयार आहोत, असेही अनेकांनी सांगितले. अनेक लोक या उपक्रमांतर्गत श्री मंगळग्रह मंदिरात फराळ व अनेक वस्तू स्वतः मंदिरात आणून देण्यासाठी प्रवृत्त झाले आहेत; तर अनेकजण वेगवेगळ्या भागांत जाऊन ते स्वतः वाटप करणार असल्याचेही सांगण्यात आले. आज सर्वप्रथम दिवाळी फराळ थेट मंगळग्रह सेवा संस्थेकडे आणून देणाऱ्या सेवाभावी आई व मुलाची प्रातिनिधिक स्वरूपात दखल घेऊन सदर वृत्त व छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.

Related Posts

जळगावात चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या १० सोशल  मीडियातील खातेधारकांविरुद्ध गुन्हे
क्राईम

प्रेमाच्या जाळ्यात ओढले, व्हिडिओवरून ब्लॅकमेलिंग; व्यापाऱ्याकडून ४७ लाख उकळल्याचा आरोप!

November 4, 2026
‘बनावट पोलीस’ बनून लूट : वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!
क्राईम

‘बनावट पोलीस’ बनून लूट : वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

November 4, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जिल्हा परिषदेतील दोन अभियंते लाचखोरीत अडकले; घरझडतीत लाखोंची रोकड!

November 4, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

पत्नी मंदिरात गेलेली असताना तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; सिंधी कॉलनीत हळहळ!

November 4, 2026
२५ वर्षीय विकीचा दुर्दैवी अंत : रेल्वेच्या खड्ड्यात दुचाकी आदळली; दोन मित्र जखमी
क्राईम

२५ वर्षीय विकीचा दुर्दैवी अंत : रेल्वेच्या खड्ड्यात दुचाकी आदळली; दोन मित्र जखमी

November 3, 2026
भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा
जळगाव

भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा

November 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
‌‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया…‌’ या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद

‌‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया…‌’ या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद

November 4, 2026
जळगावात चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या १० सोशल  मीडियातील खातेधारकांविरुद्ध गुन्हे

प्रेमाच्या जाळ्यात ओढले, व्हिडिओवरून ब्लॅकमेलिंग; व्यापाऱ्याकडून ४७ लाख उकळल्याचा आरोप!

November 4, 2026
‘बनावट पोलीस’ बनून लूट : वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

‘बनावट पोलीस’ बनून लूट : वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

November 4, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जिल्हा परिषदेतील दोन अभियंते लाचखोरीत अडकले; घरझडतीत लाखोंची रोकड!

November 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group