पाचोरा :प्रतिनिधी
महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने मिनी राज्य व्हॉलीबॉल अजिंक्य पद स्पर्धेसाठी दि. २४ एप्रिल रोजी नागपूर येथे मुले / मुली (१४ वर्षाखालील) यांची चाचणी परिक्षा घेण्यात आली. मिनी व्हॉलीबॉल स्पर्धा ह्या नागपूर येथे दि. ७ मे २०२२ ते ९ मे २०२२ दरम्यान समर्थ व्यायाम शाळा, प्रतापनगर (नागपूर) येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
सदर स्पर्धेत नाशिक विभागीय संघ सहभागी होणार आहे. या संघात गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, पाचोरा मधील इयत्ता सातवी चा विद्यार्थी ओम फनेंद्र लोहार याची निवड झाली आहे.
ओम लोहार यास प्रशिक्षक आकाश महालपुरे योग्य मार्गदर्शन करत आहेत. या प्रसंगी जिल्हा पातळी पासून ते विभागीय पातळीपर्यंत प्राविण्य मिळविल्या बद्दल व राज्य पातळीवर निवड झाल्या बद्दल स्कुलचे प्राचार्य प्रेम शामनाणी, मुख्याधपिका कल्पना वाणी, अमिना बोहरा व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या तर्फे ओमचा पालकांसोबत सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.