जळगाव मिरर | ११ डिसेंबर २०२३
देशभरातील विरोधकांनी गेल्या काही महिन्यापासून जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० वर अनेक प्रतिक्रिया दिल्या होत्या आता जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने आज ऐतिहासिक निकाल दिला. केंद्र सरकारचा निर्णय योग्यच होता, हा निर्णय संविधानाला धरूनच होता. राष्ट्रपतींना तसा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असं सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना म्हटलं. कोर्टाच्या या निर्णयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आजचा सुप्रीम कोर्टाचा ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय ऐतिहासिक आहे. कोर्टाने संसदेचा ५ ऑगस्ट २०१९ रोजी घेतलेला निर्णय कायम ठेवला आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय जम्मू, काश्मीर आणि लडाखमधील बहीण-भावासाठी आशेचा किरण आहे. ही तर प्रगती आणि एकतेची घोषणा आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
Today's Supreme Court verdict on the abrogation of Article 370 is historic and constitutionally upholds the decision taken by the Parliament of India on 5th August 2019; it is a resounding declaration of hope, progress and unity for our sisters and brothers in Jammu, Kashmir and…
— Narendra Modi (@narendramodi) December 11, 2023
‘मी जम्मू,काश्मीर आणि लडाखमधील लोकांना आश्वासन देतो की, आम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध आहोत. या निर्णयामुळे केवळ तुमची प्रगती होणार नाही, तर ३७० मुळे त्रस्त झालेल्या असुरक्षित आणि उपेक्षित घटकांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे, असं मोदींनी पुढे म्हटलं. ‘आजचा निकाल फक्त कायदेशीर नसून आशेचा किरण आहे. हा निर्णय उज्वल भविष्य करण्याचा निर्णय आहे. अखंड भारत निर्माण करण्याचा सामूहिक संकल्पाचा दाखला आहे, असंही मोदींनी म्हटलं आहे.