जळगाव मिरर | २३ डिसेंबर २०२३
राज्याच्या राजकारणात गेल्या वर्षापासून शिवसेनेत मोठी फुट पडल्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याची इच्छा अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. पण यावर कुठलाहि मार्ग निघालेला नसताना नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्या भगिनी जयवंती देशपांडे यांच्या मुलाच्या साखरपुड्यात शुक्रवारी राज आणि शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव न ठाकरे एकत्र आल्याने राजकीय वतुर्कात न चर्चाना उधाण आले.
शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव आणि राज यांनी एकत्र यावे, अशी इच्छा अनेकांनी बोलून दाखवली होती. मात्र, दोघांचीही एकमेकांवर राजकीय आरोपांची चिखलफेक सुरुच राहिली. कौटुंबिक समारंभात दोन्ही बंधू एकत्र आले आणि त्यांनी एकमेकांची विचारपूस केल्याने समारंभात उपस्थित असलेल्या नातेवाईकांना सुखद धक्का बसला. त्याची बातमी बाहेरही पसरली आणि राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली. काही दिवसांपूर्वी राज यांच्या पत्नी शर्मिला यांनी आदित्य यांची बाजू घेतल्याने ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या असतानाच कालचा प्रसंग घडल्याने अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या. शिवसैनिक आणि मनसैनिक या भेटीकडे सकारात्मकतेने पाहत असल्याचे दोन्ही पक्षांत बोलले जाते.