जळगाव मिरर | १४ जानेवारी २०२४
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी शनिवारी काढले. यात जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकांचा समावेश असून यातील पाच जण जिल्ह्याबाहेर जाणार आहे. तर तीन अधिकारी जिल्ह्यात बदलून येणार आहे. तसेच तीन अधिकाऱ्यांना अकार्यकारी अधिकारी म्हणजेच जिल्ह्यातच साईटला राहणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम मार्च, एप्रिलमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्या पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांना एका जिल्ह्यात तीन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे झाले आहे तसेच जे मूळ जिल्ह्यातील अधिकारी आहेत. अशा बदलीपात्र अधिकाऱ्यांची यादी जळगाव जिल्हा पोलिस दलाच्यावतीने तयार करण्यात आली होती. यामध्ये १३ पोलीस निरीक्षक, २७ सहाय्यक पोलीस निरीक्षक व २३ पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश होता. शनिवारी नाशिक परिक्षेत्रातील २८ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले.
तीन अधिकारी साईट बँचवर बदली झालेल्यांमध्ये जिल्ह्यातील आठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील काही जणांनी जिल्ह्यातच साईट ब्रँचची मागणी केली होती. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांची आर्थिक गुन्हे शाखेत तर चाळीसगाव ग्रामीणचे ज्ञानेश्वर जाधव यांची नियंत्रण कक्षात रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील हे तीन अधिकारी जिल्ह्यातच अकार्यकारी (साईट बँच) पदावर राहणार आहेत. बदली होवूनआलेले नवीन अधिकारी आल्यानंतर त्यांची पोलिस ठाणे मिळण्याची शक्यता आहे.
ज्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले त्यांना तात्काळ कार्यमुक्त करून पुढील आदेशाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. महानिरीक्षांच्यानंतर आता पोलिस महासंचालक आणि त्यानंतर जिल्ह्याअंतर्गत बदल्या करण्यात घिर आहे, भकार्यकारीण सावर नियुक्त केलेल्या येणार अन्य जिल्ह्यात बदलीचा प्रस्ताव द्यावा असेही आदेशात नमुद केले आहे. जिल्ह्यातून बदलून जाणारे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे- अकार्यकारी पदावर ज्ञानेश्वर जाधव-अकार्यकारी पदावर, शिल्पा पाटील अकार्यकारी पदावर, रामकृष्ण कुंभार अहमदनगर, अरुण धनवडे- नाशिक ग्रामीण, राहुल खताळ नाशिक ग्रामीण, कांतीलाल पाटील-धुळे, राजेंद्र पाटील- नाशिक ग्रामीण.
जळगावात नवीन येणारे अधिकारी – मधुकर साळवे अहमदनगर, संदीप – रणदिवे नाशिक ग्रामीण, विकास देवरे – नाशिक ग्रामीण, सुनील पाटील – नाशिक ग्रामीण.
२२ सपोनिंसह १६ पीएसआयचीं बदली
विशेष पोलीस महानिरीक्षकांनी पोलीस निरीक्षकांच्या बदल्या आदेश जारी केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील बदलीपात्र असलेल्या २२ सहाय्यक पोलीस निरीक्षक व १६ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी रात्री उशिरा काढले.