• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

आठ लाख भाविक येणार श्रीराम शिवमहापुराण ; खा. उन्मेष पाटील !

चाळीसगावात ४० एकरावर होणार कथा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 14, 2024
in जळगाव ग्रामीण
0
आठ लाख भाविक येणार श्रीराम शिवमहापुराण ; खा. उन्मेष पाटील !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव  मिरर । १४ जानेवारी २०२४

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे 16 ते 20 जानेवारी दरम्यान पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांच्या प्रभू श्रीराम महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे 40 एकरावरील या कथा सोहळ्याची पूर्वतयारी तसेच नियोजन व्यवस्था याबद्दलची सविस्तर माहिती कथा कार्यक्रमाचे आयोजक खासदार श्री.उन्मेषदादा पाटील यांनी रविवारी (ता.14) सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज, एरंडोल-पारोळा विधानसभा क्षेत्रप्रमुख करण पवार, भाजपचे जळगाव तालुकाध्यक्ष ॲड. हर्षल चौधरी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते. श्रीराम मंदिर ते राष्ट्र मंदिर या संकल्पनेच्या माध्यमातून आयोजित प्रभू श्रीराम महाशिवपुराण कथा कार्यक्रमाची मूळ कल्पना राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांची असून, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. चाळीसगाव शहरालगत मालेगाव रस्त्यावर सुमारे 40 एकरावर कथास्थळ साकारले असून, वाहनांच्या पार्किंगकरीता तब्बल 80 एकरात आठ वाहनतळ उभारण्यात आले आहे. प्रत्येक वाहनतळाचा विस्तार 10 एकरात असल्याने सर्व दिशांनी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची कोंडी होण्याचा प्रकार टाळता येणार आहे. कथेची वेळ दररोज दुपारी 2 ते 5 वाजेची असेल, असेही खासदार श्री.उन्मेषदादा पाटील यांनी सांगितले.

सुमारे सात ते आठ लाख भाविकांच्या उपस्थितीचा अंदाज
चाळीसगाव येथील महाशिवपुराण कथा कार्यक्रमासाठी सुमारे सात ते आठ लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहांची पुरेशी सोय करण्यात आली आहे. याशिवाय कथास्थळी रात्री साधारणतः दोन ते अडीच लाख भाविक मुक्कामी थांबण्याची शक्यता गृहीत धरून त्यांच्या जेवणाची सर्व व्यवस्था केली जाणार आहे. 400 मोबाईल टॉयलेट उपलब्ध राहणार असल्याने स्वच्छतेचा प्रश्नही निकाली निघणार आहे. सुमारे 16 हजार स्वयंसेवकांनी यापूर्वीच नोंदणी केलेली असल्याने भाविकांची कोणतीच गैरसोय कथा कार्यक्रमाच्या ठिकाणी होणार नाही.

विशेष आमंत्रितांमध्ये यांचा असेल समावेश
महाशिवपुराण कथा सोहळ्यासाठी केंद्रिय मंत्री डॉ. भागवत कराड यांचेसह डॉ. भारती पवार तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील तसेच खासदार रक्षा खडसे, जिल्ह्याचे सर्व आमदार, ग्रामपंचायतींचे सरपंच, विकास सोसायट्यांचे चेअरमन आदींना आमंत्रित केले आहे.

दोन लाख दिव्यांची विश्व विक्रमी श्रीराम प्रतिकृती
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमित्त साधून चाळीसगावात सुमारे दोन लाख दिव्यांचा वापर करून श्रीरामाची भव्य दिव्य प्रतिकृती साकारली जाणार आहे. विश्व विक्रमी अशी प्रतिकृती 20 जानेवारीपासून भाविकांना दर्शनासाठी खुली केली जाणार आहे.

Tags: #chalisgaonKhasdar unmesh patilPandit pradip Mishrashivpuran Katha

Related Posts

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!
जळगाव

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !
क्राईम

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026
गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक
क्राईम

गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

August 29, 2026
डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !
क्राईम

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group