जळगाव मिरर | १५ जानेवारी २०२४
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील सोनी नगर व ओंकार पार्क येथे अमृत योजनेच्या नळांना रविवारी गढूळ पाण्याचा पुरवठा झाला. याबाबत परिसरातील नागरिकांनी मनपा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता याकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. फुटलेल्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले.
रविवारी पिंप्राळा परिसरात फुटलेल्या जलवाहिनीतून गढूळ पाणीपुरवठा झाल्याचे माहिती समोर आली आहे. सोनीनगर, ओंकार पार्क परिसरातील नागरिकांच्या घरातील नळांना रविवारी पाणी आल्यावर गढूळ पाणी तसेच माती येत असल्याचे दिसून आले. नागरिकांनी मनपाच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना याबाबत तक्रार केली. परंतू तक्रारीकडे दुर्लक्ष करत थोड्यावेळाने चांगले पाणी येईल असे सांगून कर्मचारी निघून गेले. पूर्ण वेळ होऊन गेला तरी देखील पाणी गढूळ आल्याने नागरिक संतप्त झाले. यावेळी मनसे शहर संघटक श्रीकृष्ण मेंगडे यांच्या निदर्शनास आले तसेच सोनी नगरातील समाजसेवक नरेश बागडे तसेच अन्य रहिवाशांच्या निदर्शनास आणून दिले.