जळगाव मिरर | १६ जानेवारी २०२४
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या अनेक घटना घडत असतांना नवस फेडायला पोहरादेवी येथे जाणाऱ्या वाहनाचा बेलगव्हान घाटात झालेल्या अपघातात ५ जण ठार तर ११ जण जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींवर मेडिकेअर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळालेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद दिग्रस मार्गावरील बेलगव्हान घाटातील लोकनायक बापूजी अणे स्मृती स्थळ नजीक मालवाहू वाहनाचा अपघात झाला. हा अपघात घडताच वाहनातील प्रवाशांच्या परिसरातील नागरिकांना किंचाळ्या कानावर पडल्या. पाेलिसांकडून आणि घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाले आहेत. या घटनेतील मृतक, जखमी हे पुसद तालुक्यातील मोहा तांडा , टोकि तांडा पांढुरणा सिंघनवाडी येथील आहेत.
चालकाचे वाहनावरील नियंत्रण गेल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान घटनेतील जखमींची विचारपूस करण्यासाठी आणि मदतीसाठी मेडिकेयर रुग्णालयात आमदार इंद्रनील नाईक आणि आमदार निलय नाईक यांनी धाव घेतली.