जळगाव मिरर | ४ फेब्रुवारी २०२४
चाळीसगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका हॉटेलवर एक महिला ह्या अल्पवयीन मुलीला घेऊन गेली. तिथे असलेल्या दोन जणांनी या मुलीवर अत्याचार केला. तसेच ही गोष्ट बाहेर कुणाला सांगितली तर तुला मारून टाकू अशी धमकी दिली. दरम्यान पिढीत मुलीने शहर पोलिसात धाव घेतली असून पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी शहरातल्या सर्व लॉज चेक करत गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कारवाई केली होती. मात्र ह्या घटनेने पुन्हा काही लॉज चालकांचे पैसे कमावण्याचे धंदे पुन्हा एकदा समोर आले आहे.